बीड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। सीना नदीला आलेल्या पुरामुळे मूळ खडकत बंधारा क्र. १ पूर्णपणे वाहून गेला होता. हा बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करणे आणि नदीचे खोलीकरण करणे हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. नाम फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या कामाला आज जलद गतीने सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी सागर धस, नाम फाउंडेशनचे मराठवाडा संयोजक शेळके व त्यांची टीम तसेच पाटबंधारे विभागाचे सिनारे आणि कांबळे मॅडम उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis