बीडमध्ये भाजपा संघटनात्मक वाढीसाठी अथक परिश्रम - जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख
बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर वर्षभरात पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी तसेच जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलो, असे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले. बीड जिल्हाध्यक्ष पदाची
बीड


बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर वर्षभरात पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी तसेच जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलो, असे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले.

बीड जिल्हाध्यक्ष पदाची वर्षपूर्ती झाल्याबद्दल त्यांनी या संदर्भात माहिती दिली.

भारतीय जनता पक्षाची बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख म्हणाले की, बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेली एक वर्ष पूर्ण झाले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र दिले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

जो विश्वास माझ्यावर टाकला गेला त्यास अनुसरून वर्षभरात संघटनात्मक वाढीसाठी अथक प्रयत्न केले लगोलग आलेल्या विधानसभा निवडणूका यासाठी जिल्हाभर प्रवास भाजपची सदस्यता अभियान सक्रिय सदस्य अभियान पक्षाने दिलेली विविध कार्यक्रम ताकदीने कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन व त्यांच्या सहकार्याने राबवून संघटन मजबूत करण्याचे काम केले.

याच दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचे दिवशी चोंडी येथे असतानाच रोजी कार्यकारी अध्यक्ष पदावरुन तीन वर्षांसाठी नियमित जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सोशल मिडीयावर प्रदेशाध्यक्षांनी प्रकाशीत केले .

नवी प्रेरणा घेऊन कामकाज सुरू केले ज्यांच्या विचारांनी व प्रेरणेने मी घडलो असे गोपीनाथ मुंडे यांची प्रेरणा,विचार कार्य पध्दती सोबत घेऊन, जेष्ठांचे मार्गदर्शन, जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य, राज्यकार्यपरिषद सदस्य, जिल्ह्यातील २४ मंडळ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, अशा सर्व सहकार्यांच्या सोबतीने हा वर्षपूर्तीचा टप्पा पूर्ण करताना आनंद होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande