
बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्याच्या कन्येच्या, एका महिला डॉक्टरांच्या दुर्दैवी निधनानिमित्त, संपूर्ण जिल्हा दुःखात आहे.
तिच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व न्याय, सन्मान आणि सुरक्षेचा आवाज बुलंद करण्यासाठी
मेणबत्ती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बीड ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड
या मार्गावर हा मेणबत्ती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
या शांततामय मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपला एकजुटीचा संदेश द्या. चला डॉक्टर संपदा यांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र येऊया. असे आवाहन करण्यात आले आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis