काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत मंगळवारी देगलूरला प्रवेश सोहळा
नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे जाहीर जाहीर पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे मंगळवारी नवीन मोंढा मैदान देगलूर जिल्हा नांदेड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत मंगळवारी देगलूरला प्रवेश सोहळा


नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे जाहीर जाहीर पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे

मंगळवारी नवीन मोंढा मैदान देगलूर जिल्हा नांदेड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देगलूर बिलोली मतदारसंघातील भाजपा व विविध पक्षातील असंख्य प्रदेश पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष व नगरसेवक व इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ व नांदेड जिल्ह्याचे खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या व राज्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा नवा मोंढा देगलूर येथे पार पडणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande