
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)
सोफिया प्रकल्प जेव्हा सुरु होत होता. तेव्हा लोकप्रतिधिनी जिल्यातील वीजपुरवठा २४ तास राहील, जिल्ह्यात भारनियमन राहणार नाही. परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. परिणामी रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना ओलितासाठी जावे लागते. त्यातच वन्यप्राण्यांमुळे अनेकाचे अपघात होवून अनेकजण अवनीमुध्दा झालेले आहेत. बिबटच्या दहशतीत शेतकरी राहतो. शेतकऱ्याला रात्री वीज देत असाल, तर विद्युत कार्यालयमुद्रा रात्री सुरू ठेवावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील शेतक-यांनी महावितरणची शवयात्रा काढण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात आ. उमेश यावलकर यांना निवेदन दिले आहे.
ओलितासाठी रात्री १.२० ते सकाळी ९.२० या वेळेत विद्युत पुरवठा केला जातो. तो दिवसा करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सध्या अपरात्री शेतात जाऊन पाणी ओलित करावे लागते. अशा परिस्थितीत वन्यप्राणी, साप यांच्या हल्ल्याने अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले, तर काही गंभीर जखमीसुध्दा झालेले आहे. शेतकऱ्यांकरिता वीजवितरणाचे वेळापत्रक तुघलकी आहे. शेतकरी जर रात्री शेतात जाऊ शकतो तर वीज अधिकारी, कर्मचारी यांनीसुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रात्री आपले कार्यालय सुरू ठेवावे, अशी मागणी शेतकरीवर्गांनी निवेदनात केली आहे. यावेळी शेतकरी मनिष धोटे, विनायक वाडबुधे, केशव कोरडे, अस्मान शेख, विजय कनिरे, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी