
जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील नेहरू नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस दिलीप सोनवणे (२५, रा. कांचननगर) हा हद्दपार असूनही शहरात दिसला. त्याच्यासोबत खुशाल पीतांबर सोनार (२१) हा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन तर चेतन पीतांबर सोनार (२३) हा कोयता घेऊन फिरताना पोलिसांना दिसले. तीघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस पथक करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर