
नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पलसिद्ध धर्मपीठ, श्रीक्षेत्र साखरखेर्डा यांच्या प्रेरणेने आणि हदगाव येथील श्री महादेव मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. १०८ सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली हदगाव ते कपिलधार पदयात्रेला सुरुवात झाली आहे.
हदगाव शहरातील महादेव मठातून मिरवणुकीच्या रूपाने पदयात्रा रवाना झाली. या यात्रेचा पहिला मुक्काम करमोडी येथे असून, तेथे भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर पदयात्रा कपिलधार येथे मंगळवारी (दि. ४) पोहोचणार आहे. या वेळी आमदार बाबूराव कोहळीकर, माजी आमदार माधवराव जळगावकर, कृष्णा आष्टीकर, भास्कर वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.या धार्मिक पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी भक्ति, शिस्त आणि उत्साहाचे सुंदर दर्शन घडवले असून, मार्गावरील गावांमध्ये यात्रेचे स्वागत उत्साहात होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis