जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन
जालना,28 ऑक्टोबर, (हिं.स.)जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांना सर्वपक्षीय निवेदन दिले. जालना शहर व जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, लुटमारी, खंडणी, धमकावणे, गुंडगिरी आणि जीवघेणे हल्ले अशा गुन्ह्यांमध्ये झपाट्या
जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात पोलीस अधीक्षक


जालना,28 ऑक्टोबर, (हिं.स.)जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांना सर्वपक्षीय निवेदन दिले. जालना शहर व जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, लुटमारी, खंडणी, धमकावणे, गुंडगिरी आणि जीवघेणे हल्ले अशा गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेषतः नवीन मोंढा परिसरात व्यापारी आणि शेतकरी वर्गावर गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांचे हल्ले वाढले आहेत. या भागात गेल्या दहा-बारा वर्षांपासून पोलीस चौकी उभारण्याची मागणी सातत्याने होत असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांची भेट घेऊन तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

शहर व जिल्ह्यात पोलिस गस्त आणि नाकाबंदी वाढवावी. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून नियमित निरीक्षण करावे. संवेदनशील भागात रात्री पोलिस पेट्रोलिंग वाढवावे. नागरिकांसाठी पोलिस हेल्पलाइन तत्पर ठेवून तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी.

निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला की, जर योग्य ती पावले तातडीने उचलली गेली नाहीत, तर नागरिकांना पुढील आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.

जालना शहराची शांतता, नागरिकांची सुरक्षा आणि व्यापारी वर्गाचा आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.”

या प्रसंगी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री राजेशजी टोपे, भास्करराव आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, संजय मुथा, बबलू चौधरी, विनीत सहानी, अतिक खान, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, नरेंद्र मित्तल तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande