
लातूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर येथील पेठ शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही.
पेठ शिवार परिसरात अंदाजे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत तरुणाने गुलाबी टी-शर्ट, काळी पँट परिधान केली होती. कमरेला नवीन लाल करदोडा असून, डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ ‘A’ अक्षर आणि उजव्या हातावर ‘ताईसाहेब’ असे नाव गोंदलेले आहे. संबंधित इसम हिंदू धर्मीय असल्याचे समजते.
कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास, कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आत्महत्येच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis