
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। श्रीक्षेत्र माहूर येथे आलेल्या एका भाविकाची सोन्या-चांदीच्या दागिन्यासह बॅग हरवली होती. बस स्थानका परिसरात मोठी खळबळ उडाली मात्र नांदेड पोलिसांची तत्पर कामगिरी पाहायला मिळाली आणि तातडीने ही बॅग पोलिसांनी शोधून दिली आहे.
त्याचे असे झाले,माहूर येथे भाविक योगेश किशोर धारोरकर यांची ₹3,60,000/- किंमतीची रोकड व सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश कराड (पो.स्टे. माहूर) यांनी तात्काळ शोधपथक तयार केले. पथकाने परिसरात कसून तपास करत बसस्थानकाजवळील गेस्ट हाऊस परिसरातून हरवलेली बॅग शोधून काढली. बस स्थानका जवळ त्यांनी बराच शोध घेतला आणि पोलिसांना यश मिळाले.
बॅग परत मिळाल्यावर भाविकांनी पोलीसांचे मनापासून आभार मानले. नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस स्टेशन माहूर यांना शाबासकी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis