नांदेड, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 14 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis