अहेरीत फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट होऊन दोन लहान मुलांसह 20 जखमी
गडचिरोली., 3 ऑक्टोबर (हिं.स.) राजनगरी अहेरी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार्‍या दसऱ्याच्या पारंपरिक मेळाव्यात मध्यरा‍त्री झालेल्या फुग्याच्या सिलिंडर स्फोटाने खळबळ उडाली. राज महाल परिसरातील गॅस फुगे विक्रेत्याच्या हायड्रोजन सिलिंडरचा प्रचंड
अहेरीत फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट होऊन दोन लहान मुलांसह 20 जखमी


गडचिरोली., 3 ऑक्टोबर (हिं.स.)

राजनगरी अहेरी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार्‍या दसऱ्याच्या पारंपरिक मेळाव्यात मध्यरा‍त्री झालेल्या फुग्याच्या सिलिंडर स्फोटाने खळबळ उडाली.

राज महाल परिसरातील गॅस फुगे विक्रेत्याच्या हायड्रोजन सिलिंडरचा प्रचंड स्फोट होऊन दोन लहान मुलांसह तब्बल २० नागरिक जखमी झाले.

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या अहेरीच्या दसऱ्या मेळाव्यात पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येतात. या ठिकाणी मोठी जत्राच भरत असते. दरम्यान अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की मुख्य चौकापर्यंत धडक बसल्याचा भास झाला.

गंभीर जखमींना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगीतले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande