नंदुरबारमध्ये 6 ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन - कल्पना ठुबे
नंदुरबार,, 3 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे ऑक्टोंबर, 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 06 ऑक्टोंबर, 2025 रोजी दुपारी 1-वाजता जिल्हाधिकारी डॉ. मित्ता
नंदुरबारमध्ये 6 ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन - कल्पना ठुबे


नंदुरबार,, 3 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे ऑक्टोंबर, 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 06 ऑक्टोंबर, 2025 रोजी दुपारी 1-वाजता जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात दाखल कराव्यात. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून दाखल करावेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande