लातूर : पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः दगड उचलून वाहतूक केली सुरळीत
लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे कासार शिरशी परिसरातील जेवरी ते बामणी गावाला जोडणारा पूल वाहून गेला व रस्त्यात मोठा खड्डा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. या परिस्थ
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड


लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे कासार शिरशी परिसरातील जेवरी ते बामणी गावाला जोडणारा पूल वाहून गेला व रस्त्यात मोठा खड्डा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. या परिस्थितीची गंभीरता ओळखून कासार शिरशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी विलंब न लावता आपल्या सहकर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डा बुजवण्याचे काम केले. पावसामुळे प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतः दगड उचलून रस्ता बुजवून त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरळीत केली.

-------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande