कोल्हापूर - पालक मंत्र्यांसह आ.क्षीरसागर यांनी काढली पुन्हा अधिकाऱ्यांची खरडपट्टी
कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरात रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पुन्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. स्वतः प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांच्
कोल्हापूर महानगरपालिका


कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरात रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पुन्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. स्वतः प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांच्या घेतलेल्या बैठकीत महापालिकेचे अधिकारी कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करत आहेत का? अशी विचारणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी याचं उत्तर द्या, म्हणत त्यांनी जाब विचारला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम याचेसह माजी नगरसेवक उपस्थित होते.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण झाली आहे. 100 कोटींचे रस्ते करून 100 दिवस सुद्धा टिकले नाहीत, अशी स्थिती आहे. मार्गावर महाकाय खड्डे पडल्याने प्रवास करताना की नागरिकांच्या कमरेचा मणका दिवसागणिक बाद होत चालला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्याचा प्रश्न कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, या भूखंडावर खासगी कंत्राटदाराने महापालिकेच्या भूखंडावर इमारत बांधल्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित झाला. यासंदर्भात कोणतीच कारवाई अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने क्षीरसागर भडकले.

कोल्हापूर सर्किट बेंच समोरील भाऊसिंगजी रोडवर महिनाभरापूर्वी डागडूजी करण्यात आली होती. हा रस्ता केल्यापासून सुदैवाने सुस्थितीत होता. तथापि, 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मनपाकडून याच रस्त्यावर लिक्विड कोट मारून खडी पसरण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका पावसामध्येच हा लिक्विड कोट पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे महापालिकेच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक वेगाने काय विरघळून जातं तर ते डांबर अशी याची चर्चा नेहमीच होते.

कोल्हापुरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खड्डे मुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीने अवघ्या काही दिवसांमध्ये भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. खानविलकर चौकात एकाच जागेवर किमान तीनवेळा खड्डे भरण्यात आले. अशीच स्थिती अन्य मार्गावर सुद्धा झाली आहे.

याबाबतही जाब विचारत चर्चा झाली आणि त्वरित कामात सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande