पुणे, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्त अॅड. डॉ. रोहिणी पवार यांनी पुढाकार घेत देवस्थानवर महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करण्यात आली आहे.महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या देवस्थानवर महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर प्रथमच एका महिलेला विश्वस्त म्हणून संधी मिळाल्यानंतर, त्यांनी स्वतः कायदेतज्ज्ञ असल्याने सहकारी विश्वस्तांच्या मदतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.समितीत एकूण ५ सदस्य असून समितीच्या अध्यक्षा म्हणून अॅड. रोहिणी पवार यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमुळे देवस्थानाशी संबंधित महिला कर्मचारी व भक्तगण यांना न्याय व संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु