कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। 'उमंग मीडिया नेटवर्क'च्या संयुक्त अभियानाने 'किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५' या नव्या शोची घोषणा केली आहे. स्वयंपाकाच्या कलेद्वारे महिलांना ओळख मिळवून देणाऱ्या या शोचे ऑडिशन कोल्हापूर येथे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी ४ या वेळेत सयाजी हाॅटेल, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
या शोच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑडिशनदरम्यान वापरण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. समस्त महिलावर्गाने ही संधी चुकवू नये. यावेळी महिलांना महाराष्ट्रीयन सिग्नेचर डिश (शाकाहारी / जैन) उदा. मोदक, मिसळ पाव, भाकरी-पिठलं हे पदार्थ बनविण्याची परवानगी आहे.
या पदार्थांचे परीक्षण चव, सादरीकरण, परंपरागत घटकांचा वापर, क्रिएटिव्हिटी, स्वच्छता, डिशमागची कथा या बाबींवर अवलंबून आहे. या शोसाठी असलेल्या अटी व नियम यांमध्ये डिश घरी शिजवून स्वच्छ डब्यात आणावी, स्वतःचे प्लेट्स व चमचे आणणे आवश्यक, केवळ घरगुती तयारी मान्य, बाजारातील पदार्थ चालणार नाहीत, स्थळावर स्वयंपाकास परवानगी नाही (फक्त प्लेटिंग/सादरीकरण), मद्य व गैर-भारतीय मांस निषिद्ध
परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल या अटींचा समावेश आहे.
पारंपरिक/एथनिक पोशाख (साडी, कुर्ती, सलवार) परिधान करुन या पारंपरिक शोला हजेरी लावण्याची विनंती आहे. यावेळी पांढरा ऍप्रन अनिवार्य आहे. तसेच केस नीट बांधणे, अलंकार कमीत कमी वापरणे या काही अटी महिलांना देण्यात आल्या आहेत. शिवाय बंद पादत्राणे वापरण्यास पूर्णतः मनाई आहे. या शोवेळी स्वच्छता पाळणे अनिवार्य आहे. हात धुवून/सॅनिटाईज करुन सेवा द्यावी, स्वच्छ डबे व चमचे वापरावेत, कचरा योग्य ठिकाणी टाकावा असे काही स्वछतेचे नियम आहेत ते पाळावेत. या स्पर्धेदरम्यानन परीक्षक व इतर स्पर्धकांचा आदर राखावा. वाद, गैरवर्तन व चीटिंगसाठी अपात्रता ठरविली जाईल. तसेच सकारात्मक वातावरण राखणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar