नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। NEXT GEN GST REFORM या अभियानाच्या अनुषंगाने नांदेड येथील व्यापाऱ्यांशी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतेचा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी थेट संवाद साधला.त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. नवीन आर्थिक सुधारणांमुळे व्यापार क्षेत्रात पारदर्शकता, सोपेपणा आणि विकासाचे नवे मार्ग खुले होतील याबाबत चर्चा झाली.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आहे.
मराठवाडा दौऱ्यात जि. नांदेड येथे भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर, नांदेड दक्षिण ग्रामीण तसेच नांदेड जिल्हा उत्तर ग्रामीण या तीन संघटनात्मक जिल्ह्यांची NEXT GEN GST REFORM, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान आणि पदवीधर निवडणूक नोंदणी अभियान या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर बैठक संपन्न झाली.नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान नांदेड जिल्हा विश्रामगृह येथे व्यापारी बांधवांची भेट घेऊन संवाद साधला
व्यापारी वर्ग हा देशाच्या अर्थचक्राचा कणा असून आत्मनिर्भर भारत घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या संवादातून व्यापाऱ्यांचा विश्वास अधिक बळकट करून त्यांच्या सहकार्याने सरकारच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला. या बैठकीतून निश्चितच व्यापारी बांधवांचा सक्रिय सहभाग वाढून NEXT GEN GST REFORM अभियानाला नवी दिशा मिळणार आहे. असे डॉक्टर कराड यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis