बीड, 3 ऑक्टोबर,(हिं.स.)। बीड तालुक्यातील लिंबागणेश–बोरखेड रस्ता अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेला होता, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सततच्या पावसामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला होता याची दखल बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली.
आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांना पुन्हा सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकारी समवेत रस्ता व पुल पाहणी केली होती.आज प्रत्यक्ष पाहणी केली हे काम पुर्ण झालेले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis