गडचिरोली, 3 ऑक्टोबर (हिं.स.)
राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, 4 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आगमन व मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा व सरळसेवेने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देणेबाबतच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. गडचिरोली येथून वडसाकडे प्रयाण. दुपारी 01.30 वा. वडसा येथे आगमन व झाडीपट्टी नाटयसंमेलन कार्यक्रमास आदर्श महाविद्यालयाचे प्रांगण, वडसा येथे उपस्थिती. दुपारी 3 वा. कार्यक्रमस्थळावरुन शासकीय विश्रामगृह वडसा येथे आगमन व राखीव. दुपारी 04.30 वा. वडसा येथून नागपूरकडे प्रयाण.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond