सोलापूर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्याने, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्याकडून, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पो भरून मदत पाठविली आहे त्यात तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, रवा, बिस्कीटे, पाणी बॉटल आणि कपडे, असे जीवनावश्यक वस्तू आहेत. आज रोजी पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी काँग्रेस भवन सोलापूर येथून रवाना झाले आहेत. या मदतीबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी अधिक माहिती दिली.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव, मा. सतेज पाटील यांचे प्रतिनिधी शुभम चव्हाण ( जिल्हाध्यक्ष – कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मिडीया), योगेश चौगुले, किशोर खानविलकर, यश पाटील, आनंदा करपे, यांच्यासह तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार, वैभव पाटील, संजय गायकवाड, आदी उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड