छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाने अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नसल्याने शेतकरी व मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्यासाठी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही केंद्र शासनाचे कोणतेही पथक किंवा प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात आलेले नाही. असा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन जालना लोकसभेचे खासदार श्री. कल्याणराव काळे , जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. किरणभाऊ पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. शेख युसूफभाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis