लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
आपल्या श्रीराममंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची भिंत कालच्या अतिवृष्टीच्या पावसाने कोसळली. निलंगा येथील हा समर्थ सांप्रदायाचा वर्ष १६५० च्या सुमारे स्थापन झालेला मठ आहे.स्वतः समर्थ रामदास स्वामी यांनी निलंगा येथे स्वतः येऊन बत्तीस शिराळा येथील आपले शिष्य आनंद स्वामी यांची मठपती म्हणून नेमणूक केली होती.तेव्हापासून रामदासी कुटुंबाची परंपरा श्रीरामाच्या सेवेत आहे.
कालौघात या मंदिराच्या जुन्या बांधकामाची बरेचदा जीर्णोद्धार व डागडुजी करण्यात आलेली होती.मात्र सततच्या मुसळधार व झडीच्या पावसामुळे या राममंदिराच्या गाभाऱ्याचा पश्चिम प्रदक्षिणा मार्ग क्षतिग्रस्त झालेला आहे.भक्तांच्या सहभागातून या राम मंदिराचे संपूर्ण पुनर्निर्माणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis