नांदेड : दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी उमरखेड ते हदगाव वाहतुकीत बदल
नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी शनिवारी 4 ऑक्टोबर रोजीउमरखेड ते हदगाव वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हदगाव व उमरखेड शहरातील दुर्गादेवी विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीमध्ये होते. दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी पैनगंगा नदी पुलावर
नांदेड : दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी उमरखेड ते हदगाव वाहतुकीत बदल


नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी शनिवारी 4 ऑक्टोबर रोजीउमरखेड ते हदगाव वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

हदगाव व उमरखेड शहरातील दुर्गादेवी विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीमध्ये होते. दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी पैनगंगा नदी पुलावर भक्तांची मोठी गर्दी होते. याअनुषंगाने उमरखेड येथून हदगावकडे येणारी वाहतूक पैनगंगा नदीपासून ते मल्लीनाथ हॉलपर्यंत शनिवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते रविवार 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 3 वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.

याबाबत मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. या अधिसुचनेनुसार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाय योजना करावी. संबंधित सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशीत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande