सुरगाणात दसऱ्याच्या दिवशी भूकंपाची धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सुरगाणा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी रात्री भूकंपाचे धक्का जाणवला आहे. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद सिडिओ मेरी येथील भूकंपमापन केंद्रामध्ये झाली आहे. धक्क्यानंतर येथील नागरिकांमध्ये एकच घबराट निर्
भूकंप


सुरगाणा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी रात्री भूकंपाचे धक्का जाणवला आहे. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद सिडिओ मेरी येथील भूकंपमापन केंद्रामध्ये झाली आहे. धक्क्यानंतर येथील नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. याबाबतची माहिती तातडीने प्रशासनाला कळविण्यात आली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यामध्ये फाईन दसऱ्याच्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासकिय सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सुरगाणा तालुक्यामध्ये असलेल्या नागेश वाडी वांजुळपाडा मोहपाडा चिराई या भागामध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य टक्के जाणवले. ज्यावेळी भूकंपाचे धक्के या परिसरात बसत होते. त्यावेळी जमिनीखालून आवाज येत होता. तर घरे व भांडे हल्ल्याची माहिती येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेली आहे. घटनेची माहिती तातडीने येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून नाशिक येथील सीडीओ मेरीच्या भूकंपमापन केंद्रामध्ये याची नोंद झाली आहे. या ठिकाणी 2.1 रिक्टर स्केल एवढी नोंद झाल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande