परभणीतील आपदग्रस्तांना जैन संघटनेद्वारे जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप
परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जैन संघटनेतर्फे या जिल्ह्यातील पुरग्रस्त गावातील आपदग्रस्त कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरित केले जात असून पहिल्या टप्प्यातून साळापुरी (ता.परभणी) दुसर्‍या टप्प्यात रामपुरी (ता. पाथरी) तर आज शुक्रवारी तिसर्
थार व वांगीतील आपदग्रस्तांना जैन संघटनेद्वारे कीट वाटप


परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारतीय जैन संघटनेतर्फे या जिल्ह्यातील पुरग्रस्त गावातील आपदग्रस्त कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरित केले जात असून पहिल्या टप्प्यातून साळापुरी (ता.परभणी) दुसर्‍या टप्प्यात रामपुरी (ता. पाथरी) तर आज शुक्रवारी तिसर्‍या टप्प्यातून थार व वांगी (ता. मानवत) या गावातील 51 आपदग्रस्त कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरणाकरीता पाठविण्यात आले.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तू त्यात किराणा सामानाच्या 20 वस्तू, ब्लँकेट, कपडे, साड्या व अन्य सामान समाविष्ट असणारे कीट वितरणाकरीता घेवून जाणार्‍या वाहनास हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे अ‍ॅड. झुंबरलाल मुथा, पुजा मुथा, सुनिल जैन, अक्षय देसरडा, सचिन मुथा, प्रफुल्ल छाजेड, राजेश अंबुरे, मनोज कुचेरीया यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande