अनुकंपा व सरळसेवा भरतीतील 160 उमेदवारांना नियुक्ती आदेश
सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडून दिनांक17जुलै2025रोजी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर करण्यात आले असून,मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या150दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती व महाराष
अनुकंपा व सरळसेवा भरतीतील 160 उमेदवारांना नियुक्ती आदेश


सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडून दिनांक17जुलै2025रोजी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर करण्यात आले असून,मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या150दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक-टंकलेखक परीक्षा2023च्या शिफारशीच्या अनुषंगाने उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अनुषंगाने,सोलापूर जिल्ह्यातील गट-क व गट-ड मधील अनुकंपा तत्वावर तसेच एमपीएससीमार्फत सरळसेवा भरतीद्वारे नियुक्ती मिळवलेल्या एकूण160उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्याचा भव्य कार्यक्रम शनिवार,दि.4ऑक्टोबर2025रोजी सकाळी11.00वाजता नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला,विजापूर रोड,सात रस्ता,सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित राहून सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करणार आहेत.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांना दिनांक3ऑक्टोबर रोजी सकाळी9.00वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधित कार्यालय प्रमुख व नियुक्ती प्राधिकारी यांनी विहीत नमुन्यातील मूळ नियुक्ती आदेश दिनांक3ऑक्टोबर रोजी सकाळी11.00वाजता समक्ष सादरकरण्यातआलेले आहेत.

तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande