नंदुरबार, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) - शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा समितीचे शशांक काळे यांनी कळविले आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्हास्तरीय पारितोषिक प्रथम विजेता श्री. काका गणेश मंडळ, तळोदा व द्वितीय विजेता लालपरीचा राजा नंदुरबार बस आगार, नंदुरबार ही मंडळ आहेत. या गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांकासाठी रुपये 50 हजार व द्वितीय क्रमांकासाठी रुपये 40 हजार एवढ्या रक्कमेचे पारितोषिक व
प्रमाणपत्र देऊन लवकरच गौरविण्यात येणार असल्याचेही सदस्य सचिव श्री. काळे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर