शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे परीक्षा शुल्क भरुन ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करु शकतात. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande