बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी येथील डोंगराला भेगा पडून जमीन खचल्याची बाब निदर्शनास आलेले असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले असून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायकराव मेटे यांनी भेट घेतली.
तज्ञांमार्फत या गावाचे परिसराची पाहणी करण्यात येऊन यथोचित कार्यवाहीस्तव कृपया जिल्हाधिकारी यांस सुचित करावे तसेच गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात यावी तसेच अतिवृष्टीमुळे ज्या गावातील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्या रस्ते व पुलांचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे असे मेटे यांनी निवेदन सादर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis