एकरकमी व्याज परतावा योजनेस मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थीकडून, थकीत कर्ज वसुलीसाठी यापूर्वी लागू केलेल्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कम व्याजासह एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस 50 टक्के सवलतीची योजनेच्या प
एकरकमी व्याज परतावा योजनेस मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ


चंद्रपूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थीकडून, थकीत कर्ज वसुलीसाठी यापूर्वी लागू केलेल्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कम व्याजासह एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस 50 टक्के सवलतीची योजनेच्या प्रथम टप्प्यास दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. 50 टक्के व्याज सवलतीच्या सदर योजनेस आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसार, सर्व योजनांतर्गत कर्ज खाते बंद करू इच्छिणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावे. योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीची माहिती विहीत नमुन्यात मुख्यालयास दरमहा सादर करावी, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande