परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतनविना काम करीत आहेत. या परिस्थितीमुळे अनेक कर्मचार्यांना आर्थिक अडचणींसह मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर करून थकीत वेतन तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास किंवा महावितरण कंपनीची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis