मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव सादर करा - नितेश राणे
छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.
अ


छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

फुलंब्री मतदार संघाच्या आमदार अनुराधा चव्हाण, मस्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, छत्रपती संभाजी नगर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, तहसीलदार योगिता खटावकर, सहाय्यक आयुक्त मधुरिमा जाधव,जलसंधारण विभागाचे उप अभियंता श्री वनगुजरे, मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष सुषमेश प्रधान आदी यावेळी उपस्थित होते.

फुलंब्री शहर लहान्याची वाडी या सांडव्याच्या ठिकाणी मत्स्यव्यवसायिक मासेमारी व्यवसाय करत असतात. अतिवृष्टीमुळे अतिरिक्त वाहून आलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांचे जाळ्यांचे नुकसान झाले. तसेच मत्स्यबीज पुराच्या पाण्यात वाहून गेले. तसेच वाढ होत असलेले मासेही वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मंत्री राणे हे जिल्ह्यात आले होते. त्यांनी लाहन्याची वाडी ता. फुलंब्री सांडवा येथे प्रत्यक्ष पाहणी करून मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. याठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्या पंचनाम्यांच्या आधारे मच्छिमारांबा मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश श्री. राणे यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना शासनामार्फत योग्य ती मदत देण्यात येईल,असे आश्वस्त करुन त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande