छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। मत्स्य व खार बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथील मच्छीमार समाजातील बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
फुलंब्री धरण परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या
आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मच्छीमार समाजातील बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी मत्स्य व खार बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत केले. फुलंब्री दौऱ्यानिमित्त त्यांच्या आगमनाने विकासाच्या नवनवीन संधींना गती मिळेल, असा विश्वास आहे..
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis