दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा माझा ध्यास : हसन मुश्रीफ
कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनि
दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरण वाटप


कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन आनंदी आणि सुकर करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल पंचायत समितीच्यावतीने सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालय दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्यावतीने एडीपी योजनेअंतर्गत ४७७ दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरण वाटप करण्यात आले.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सुदृढ लोकांना थोड्या जरी वेदना झाल्या आणि एखादा अवयव दूखू लागला तर चैन पडत नाही. मग, जन्मापासूनच अपंग व्यक्तींचे जीवन कसे हालाकीचे असेल याचा विचार करा. अशा लोकांना आधार देण्याची गरज आहे. परमेश्वराने अशा परिस्थितीत त्यांना पाठवले त्यांचे जीवन कसे सुकर होईल यासाठी माझा प्रयत्न आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दिव्यांगांच्या वेदना आणि हालअपेष्टा कमी होतील यासाठी काम करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हे काय मी उपकार करत नाही, माझे कर्तव्य समजतो . दिव्यांग लोकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करू. २००१ साली मतदारसंघात डोळे तपासणी शिबिर घेतले होते. त्यावेळी ८० हजार लोकांना चष्म्यांचे वाटप केले होते. मोतीबिंदू ऑपरेशनही करून आणली होती. आता तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी पूर्ण होत आहे. तसेच जिल्ह्यातील सतरा हजार मुलींना कॅन्सरवरील लस दिली आहे. उर्वरीत मुलींनाही लवकरच ही लस दिली जाणार आहे .

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande