परभणी : राष्ट्रीय नेमबाज अली अहमद खान यांचा सत्कार
परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय नेमबाज अली तहसिन अहमद खान यांनी भोपाल येथे झालेल्या 12व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले. त्याबद्दल शहरातील त्रिमूर्ती नगर येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या राष्ट्रीय नेमबाज अली अहमद खान यांचा सत्कार


परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय नेमबाज अली तहसिन अहमद खान यांनी भोपाल येथे झालेल्या 12व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले. त्याबद्दल शहरातील त्रिमूर्ती नगर येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी वन अधिकारी तहसीन अहमद खान, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती धोंडीराम चव्हाण, बाळासाहेब रसाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुळशीराम सामाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संग्राम जामकर, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, अज्जू भैय्या, गजानन सामाले यांच्यासह अन्य उपस्थित होते.दरम्यान, 12व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत देशातील अनेक राज्यातील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू आणि अली अहमद खान या खेळाडूंनी सारखेच गुणांकन 44 मिळविले आहे, परंतु खेळाच्या काही नियमनुसार त्यांना द्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. ट्रॅप शूटिंग प्रकारातील ही त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यांनी आजपर्यंत देशपातळीवर अनेक स्पर्धेत पदक मिळविले आहे. त्यांनी महाराष्ट्राची मान देशात उंचावून परभणीचे जिल्ह्याचे देशपातळीवर नाव लौकिक केले आहे. आगामी काळात ते जागतिक पातळीवर नक्कीच उत्तम कामगिरी करतील ही अपेक्षा आहे अली अहमद खान यांचे शूटिंग खेळातील यश हे परभणी सारख्या ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या जिल्ह्यातील तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande