परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : कृषी उत्पन्न बाजार समिती, पालम (ता. पालम, जि. परभणी) चे सभापती श्री. गजानन गणेशराव रोकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी परभणी येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केले. आपल्या पत्रात रोकडे यांनी खाजगी कारणास्तव पुढे सभापती पदावर कार्य करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वखुशीने सभापती पदाचा राजीनामा सादर करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राजीनाम्याची प्रत माहितीस्तव सहायक निबंधक, सहकारी संस्था पालम तसेच सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती पालम यांना पाठविण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात रोकडे यांचा राजीनामा दाखल झाला. त्यांच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या पुढील कामकाजावर कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis