सोलापूर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त करा - सचिन इथापे
सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. अतिवृष्टीमुळे शहरातील व शहरात येणार्‍या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. येणार्‍या वारकरी भा
सोलापूर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त करा - सचिन इथापे


सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. अतिवृष्टीमुळे शहरातील व शहरात येणार्‍या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. येणार्‍या वारकरी भाविकांना तसेच नागरिकांना वाहतुकीबाबतची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, वैभव बुचके, मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande