पुण्यात रविवारी दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन
पुणे, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। सकल धनगर समाज महाराष्ट्रमार्फत दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन रविवारी (ता. ५) गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. याप्रसंगी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण व उपोषणकर्ते यांचा स
पुण्यात रविवारी दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन


पुणे, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। सकल धनगर समाज महाराष्ट्रमार्फत दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन रविवारी (ता. ५) गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. याप्रसंगी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण व उपोषणकर्ते यांचा सन्मानही होणार आहे. या अधिवेशनाचे उद्‍घाटन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, रामराव वडकुते, रामहरी रूपनवर, हरिदास भदे आदींच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती समाजाचे समन्वयक ॲड. विजय गोफणे आणि सोमनाथ देवकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अधिवेशनात धनगर समाजासाठी एसटी आरक्षण, आर्थिक सक्षमीकरण व संस्था निर्मिती, महिलांचा विकास व महिला चळवळ, सामाजिक संघटन बांधणी, नेतृत्व निर्मितीचे विविध पर्याय व पद्धती, माध्यमातील स्थान इत्यादी विषयांवर विविध सत्रांत मार्गदर्शन होणार आहे. तसेच राज्यातील विविध क्षेत्रांत चांगले कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने केला जाणार आहे. यामध्ये साहित्य, क्रीडा, उ‌द्योजकता, राजकीय, वैद्यकीय सेवा, शेती, कामगार संघटन, प्रबोधन, प्रशासकीय सेवा, महिला संघटन, शैक्षणिक क्षेत्र, सेवाभावी संस्था, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार आहे. या अधिवेशनातून धनगर एसटी आरक्षण लढ्याची पुढची दिशा ठरविली जाणार आहे, तसेच समाजाच्या विविध मागण्यांचे, विषयांचे ठराव घेऊन सदर ठराव सरकारला पाठविले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande