बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।तात्या-आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित अँड अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना अत्यंत प्रतिष्ठित समाजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.यामधील 2025 चा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त संकल्प विद्या मंदिर शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे- चोले यांना नुकताच शिक्षण सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याबद्दल संकल्प विद्या मंदिर शाळेचे सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षक वृंद यांच्या वतीने अभिनंदन. करण्यात आले
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis