परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असणार्या अनेक वैद्यकीय अधिकार्यांनी खाजगी रुग्णालये थाटली असून त्यांचे हे कृत्य सरळसरळ शासनाची व सर्वसामान्य नागरीकांची शुध्द फसवणूक करणारे आहे, त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयांमधुन योग्य सेवा मिळत नाही, अशी तीव्र खंत व्यक्त करीत लोकशासक आंदोलन पार्टीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून या डॉक्टरांच्या खाजगी रुग्णालयावर निर्बंध लावावेत, अशी मागणी केली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन करीत या अनुषंगाने चौकशी केली. परंतु, संबंधित समितीने मुद्देसुद चौकशी न करता केवळ लेखी जबाब मागून घेतले व त्या आधारे अहवाल तयार केला. त्याचे परिणाम वैद्यकीय अधिकार्यांची खाजगी रुग्णालये सुरुच आहेत, अशी खंत व्यक्त करीत या प्रकाराबाबत सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सचिन काळे यांनी या निवेदनाद्वारे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis