मराठी भाषा संवर्धनासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह उपयुक्त – पुणे आयुक्त
पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श तसेच विचारांचा वारसा पिंपरी चिंचवड शहराला लाभला आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये संतसाहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा या समृद्ध मराठी भ
मराठी भाषा संवर्धनासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह उपयुक्त – पुणे आयुक्त


पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श तसेच विचारांचा वारसा पिंपरी चिंचवड शहराला लाभला आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये संतसाहित्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा या समृद्ध मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रत्येकालाच गर्व आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने नेहमीच मराठी भाषेच्या संवर्धन,प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महापालिकेने आयोजित केलेला अभिजात मराठी भाषा सप्ताह हा मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल. तसेच या माध्यमातून चांगले कलाकार तर घडतीलच,शिवाय चांगले रसिक देखील घडण्यास मदत होईल, ’असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने आणि महानगरपालिकेचे श्री. भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहभागातून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी“अभिजात मराठी भाषा दिवस”तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत“अभिजात मराठी भाषा सप्ताह”आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande