अलिबागमध्ये श्रीजालेक्ट्रॉन इ-सायकल विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न
रायगड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : अलिबाग शहरात श्रीजालेक्ट्रॉन इ-सायकल विक्री व प्रसार केंद्राचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. निसर्गाचे रक्षण, प्रदूषण कमी करणे, इंधनाची बचत आणि नागरिकांचे आरोग्य टिकवणे या उद्देशाने या ई-सायकलचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्र
अलिबागमध्ये श्रीजालेक्ट्रॉन इ-सायकल विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न


रायगड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) :

अलिबाग शहरात श्रीजालेक्ट्रॉन इ-सायकल विक्री व प्रसार केंद्राचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. निसर्गाचे रक्षण, प्रदूषण कमी करणे, इंधनाची बचत आणि नागरिकांचे आरोग्य टिकवणे या उद्देशाने या ई-सायकलचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सांगितले. माणुसकी प्रतिष्ठान व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्यावतीने या उपक्रमाची जनजागृती राबवली जात आहे.

“व्यायामासाठी सायकल उत्तम आहेच, पण प्रत्येकाने दैनंदिन प्रवासातही ई-सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे प्रदूषण व वाहतूक कोंडी कमी होईल,” असे आमदार दळवी यांनी सांगितले. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही अलिबाग शहरातील नागरिकांना ई-सायकल वापरण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे व डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी यांना ई-सायकल भेट देण्यात आली. या वेळी डॉ. नितीन गांधी, डॉ. राजाराम हुलवान, रत्नप्रभा बेल्हेकर, नरेन जाधव, भरत तन्ना, विजय वनगे, विपिन राऊत, तानाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.“एक ई-सायकल वापरणे म्हणजे पन्नास झाडे लावल्याइतका फायदा होतो,” असे डॉ. राजाराम हुलवान यांनी सांगितले. तर डॉ. नितीन गांधी यांनी ईंधनासोबत पैशाची बचतही होणार असल्याचे मत व्यक्त केले.

या नव्या विक्री केंद्रामुळे अलिबागमध्ये पर्यावरणपूरक व आधुनिक प्रवासाचे नवे पर्व सुरू होणार असून, शहरातील नागरिकांना आरोग्यदायी व किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.या प्रसंगी अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande