परभणी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।शिक्षकांचा सत्कार म्हणजे शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाला ओळख देऊन त्यांचा गौरव करणे होय. ही बाब लक्षात घेऊन लीनेस क्लब ऑफ परभणीतर्फे एका विशेष कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
लीनेस क्लब ऑफ परभणीच्या अध्यक्षा सौ.रेखा अरविंदराव सावते यांच्या संकल्पनेतून परभणी शहरातील जव्हार यांच्या वतीने पोलीस भरतीसाठी तरुण, तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष वर्ग घेतले जातात अशा संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याठिकाणी कार्यरत सात शिक्षक यांच्यासह मार्गदर्शक जव्हार यांचा यावेळी लीनेस क्लब ऑफ परभणीतर्फे डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला लीनेस क्लब ऑफ परभणी अध्यक्ष सौ.रेखा अरविंदराव सावते, सचिव सुरेखा पावडे, कोषाध्यक्ष - जयश्री चरकपल्ली, सरोज देशपांडे, पूनम मारवाह, सुजाता सोनकांबळे, विद्या वाढवे, विजया कातकडे आदींची उपस्थिती होती.
अशा सत्कारांमुळे शिक्षकांच्या कठोर परिश्रमाला आणि निस्वार्थ सेवेला ओळख मिळते. शिक्षकांना प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे ते अधिक उत्साहाने कार्य करतात.विद्यार्थी आणि समाजाला शिक्षकांच्या महत्त्वाचे महत्त्व कळते.
आदर्श शिक्षकांना सन्मानित केल्याने इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे विचार यावेळी मांडण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis