बीड - धावडी गावातील शिक्षिकेची बदली; विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण गाव झाले भावुक
बीड, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील धावडी गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे. त्या शाळेतील शिक्षिका रंजना जाधव यांची नुकतीच बदली झाली. रंजना या इन्स्टाग्रामवर त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच्या सुंदर सुंदर व्हिडिओ मुळे लोकप्रिय आहेत. त्य
शिक्षीका बदली


बीड, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील धावडी गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे. त्या शाळेतील शिक्षिका रंजना जाधव यांची नुकतीच बदली झाली. रंजना या इन्स्टाग्रामवर त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच्या सुंदर सुंदर व्हिडिओ मुळे लोकप्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर आई सारखं जीव लावल्या होत्या. परंतु, त्यांची बदली होणार हे जेव्हा विद्यार्थ्यांना आणि गावातील नागरिकांना कळाले तेंव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. खरे तर रंजना यांच्यासाठी सुद्धा हा क्षण खूपच भावूक होता. असे शिक्षक आजच्या काळामध्ये फार कमी आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande