महिला सक्षमीकरणासाठी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
नाशिक, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एन.बी. ठाकूर लॉ कॉलेजतर्फे आधुनिक जगात महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांपुढील आव्हाने आणि उपाययोजनांसाठी बहुविद्याशाखीय दृष्टीकोन या विषयावर 4 आणि 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता कॉलेजरोडवरील गूरूदक्षि
महिला सक्षमीकरणासाठी आज पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद, एनबीटी लॉ कॉलेजतर्फे आयोजन


नाशिक, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एन.बी. ठाकूर लॉ कॉलेजतर्फे आधुनिक जगात महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांपुढील आव्हाने आणि उपाययोजनांसाठी बहुविद्याशाखीय दृष्टीकोन या विषयावर 4 आणि 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता कॉलेजरोडवरील गूरूदक्षिणा हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद भरविण्यात येत आहे.

या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी डॉ. दिप्ती देशपांडे करणार असून परिषदेला मागदर्शन करण्यासाठी आंतररराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक डॉ. फारूख हकीम, श्रीलंका येथील युनिव्र्व्हसिटी ऑफ कोलंबोचे देशबंधू प्रा.डॉ. जीवा निरीला, डॉ. आर.पी. देशपांडे, केरळ येथून डॉ. जी.बी. रेड्डी, मुंबई येथील एसएनडीटी वूमन्स युनिव्हसिटीच्या डॉ. रूबी ओझा, पूणे येथील एसपीपीयु चे प्रो. व्हाईस चॅन्सेलर डॉ. जी.बी. रेड्डी, एसपीपीयूच्या मॅनेजमेंट कॉन्सिलचे सदस्य सागर वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत पॅनलवाईज चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून शनिवारी (दि.४) पहिल्या सत्रात दुपारी १२ ते १.३० दरम्यान जागतिक स्तरावर भारतातील अंमलबजावणीतील अंतरांचा आढावा या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

रविवारी (दि.५) सकाळी ९ ते १० दरम्यान दुसऱ्या सत्रात वेतनातील तफावत आणि अनौपचारिक कामांच्या आव्हान या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. समग्र सक्षमीकरण महिला आरोग्य मानसिक कल्याण आणि सामाजिक-आर्थिक प्रगती-या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.. परिषदेच्या समारोपाला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी डॉ. दिप्ती देशपांडे, डॉ. पराग कालकर, डॉ. नितीश नवसागरे, मुक्ता दाभोळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन एन.बी.टी. लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. हारूनरशिद काद्री यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande