नांदेडमध्ये डिसेंबर महिन्यात विश्वशांती महायज्ञाचे आयोजन
नांदेड, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेडमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात होत असलेल्या या महायज्ञाच्या आयोजनाच्या प्रित्यर्थ, श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर, श्री केदारनाथ रावल पदवी वि
अ


नांदेड, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेडमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यात होत असलेल्या या महायज्ञाच्या आयोजनाच्या प्रित्यर्थ, श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर, श्री केदारनाथ रावल पदवी विभूषित,

श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, हिमवत केदारपीठ यांचे पावन आशीर्वचन व दर्शन लाभणार आहेत.

या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज बिलोली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची उपस्थिती होती. बैठकीस श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी (हिमवत केदारपीठ) व आमदार जितेश अंतापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande