राज्यात 85 ते 96 लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा
पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी 1 नोव्हेंबरपासून पेटणार, हे मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम झाले आहे. त्यानुसार यंदाचा हंगाम 2025-26 मध्ये इथेनॉलकडे सुमारे 20 लाख मे. टन साखर जाणार असून, प्रत्यक्षात साखरेचे उत्पादन हे 85 त
राज्यात 85 ते 96 लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा


पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी 1 नोव्हेंबरपासून पेटणार, हे मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम झाले आहे. त्यानुसार यंदाचा हंगाम 2025-26 मध्ये इथेनॉलकडे सुमारे 20 लाख मे. टन साखर जाणार असून, प्रत्यक्षात साखरेचे उत्पादन हे 85 ते 96 लाख मेट्रिक टनाच्या आसपास राहण्याचा संयुक्त अंदाज वर्तविण्यात आला आहे. चालू वर्षी एकूण ऊस उपलब्धता, होणारे ऊस गाळप, साखर उत्पादन, सरासरी साखर उतारा याबाबत माहिती देण्यात आली.राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेती, फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून जमीनही खरडून जाण्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास आता एक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दिवाळीनंतरच ऊस गाळप सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची उपस्थितीही हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू राहण्याची अपेक्षा आहे. गतवर्षीचा हंगाम 2024-25 मध्ये सरासरी ऊस गाळपाचे 85 दिवस राहिले आहेत. यंदाच्या 2025-26 च्या हंगामातील उपलब्ध उसाची स्थिती तुलनात्मकदृष्ट्‌‍या अधिक असल्याने सरासरी 100 ते 110 दिवस हंगाम राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande