सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। विकसित महाराष्ट्र2047या दीर्घकालीन दृष्टिकोनांतर्गत राज्यातील युवक व क्रीडा क्षेत्राशी संवाद साधण्यासाठी पुणे येथे युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विभागस्तरीय कार्यक्रमात सोलापूर,पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,शिवछत्रपती पुरस्कारार्थी,युवा पुरस्कारार्थी,प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक,पालक,संघटनांचे प्रतिनिधी,क्रीडा पत्रकार व अधिकारी सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक सहभागी यांनी आपली उपस्थिती दिनांक13ऑक्टोबर2025पर्यंतdsosolapur1@gmail.comया ईमेलवर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कुमठा नाका,सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदवावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी खेळाडूंना मुख्य कार्यक्रमाच्या वेळेच्या दोन तास आधी उपस्थित राहून संबंधित क्रीडा प्रकाराशी निगडित अडीअडचणी,सुविधा व शासनाकडून असलेल्या अपेक्षांबाबत चर्चा करून मुद्दे तयार करणे अपेक्षित आहे. हे मुद्दे मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रतिनिधींकडून मांडले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड