बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे ५०५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्याचा तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान ५०५ जणांनी खोटी व बनावट कागदपत्रे वापरून विविध शासकीय लाभ मिळविल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाने स
५०५ जणांवर बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा दाखल


अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्याचा तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान ५०५ जणांनी खोटी व बनावट कागदपत्रे वापरून विविध शासकीय लाभ मिळविल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाने सोमय्या यांच्या भेटीपूर्वीच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की अनेक अर्जदारांनी सादर केलेल्या ओळखपत्रांवरील व पत्त्यांवरील माहिती खोटी आहे. काही प्रकरणांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक व्यक्तींची नावे आढळल्याने फसवणुकीचा संशय बळावला आहे. या प्रकरणात नामनिर्दिष्ट ५०५ जणांमध्ये अनेक महिला असून, विशिष्ट समुदायातील लोकांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिसांनी सर्व संबंधित कागदपत्रे जप्त केली असून, दस्तऐवजांची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande